दोन दिवसांनी पाणी 
मुंबई

नवी मुंबई, ठाणेकरांना मिळाले 40 तासानंतर पाणी ; जलवाहिनी दुरुस्तीमुळे हाल 

शरद वागदरे

वाशी ः नवी मुुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदरला पाणीपुरवठा करणारी बारवी धरणाची मुख्य जलवाहिनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास खिडकाळी येथे फुटल्याने शनिवारी व रविवार दिवसाभर या शहारातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद होता. परिणामी नागरिकांचे शनिवार व रविवार असे दोन दिवस मिळून तब्बल 40 तास पाण्याची वाट पाहावी लागली. अखेर चाळीस तासांनतर रहिवाशांना पाणी मिळाले. शनिवारी रात्री पाण्याची जलवाहिनी दुरुस्ती केल्यांनतर रविवारी सकाळी पाणी येणार असल्याचे एमआयडीसीच्या कार्यकारी अंभियंत्यांनी सांगितले. मात्र रविवारी सकाळी पाणी न आल्यामुळे रहिवाशांनी मनस्ताप सहन करावा लागला. 


शुक्रवारी रात्री या जलवाहिनीला तडा गेला. शनिवारी दिवसभर तिच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. शनिवारी रात्री 12 वाजेपर्यत हे काम पूर्ण होण्याचा अंदाज एमआयडीसीचचे कार्यकारी अभियंता एम एस कळकूटकी यांनी व्यक्त केला होता. मात्र शनिवारी रात्री काम करत असताना पुन्हा जलवाहिनी नादुरुस्त झाल्यामुळे रविवारी दिवसभर जलवाहिनीचे काम करण्यात येत होते. अखेर रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जलवाहिणी दुरुस्ती झाल्यांनतर चार वाजण्याच्या सुमारा रहिवाशांना पाणी मिळाले. मात्र उंचवटा असणाऱ्या भागाता रविवारी सांयकाळ नंतर पाणी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे रहिवाशांनी संताप व्यक्त केला. तर पाणी येण्यास सुरुवात झाल्यांनतर नागरिकांची पाण्यासाठी झुंबड उडाली होती. तर नवी मुंबई पालिका क्षेत्रातील दिघा, ठाण्यातील कळवा, ठाणे पूर्व आणि मिरा भाईंदरमधील काही भागांत एमआयडीसीचा बारवी धरणातून पाणी पुरवठा होता  

Water came to Navi Mumbai, Thane division after two days due to repair of Barvi dam pipeline

( संपादन ः रोशन मोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : एलिसे पेरीने लाईव्ह सामन्यात बाबर आझमला केलं प्रपोज? BBL सामन्यात नेमकं काय घडलं?

'चला काहीतरी चांगलं पहायला मिळणार...' समरचा भूतकाळ स्वानंदीला कळणार! आजीला विश्वासात घेऊन स्वानंदी घरातल्यांचं सत्य समोर आणणार

Bank Loan EMI: दिलासादायक बातमी! गृह आणि कार कर्जाच्या ईएमआयवर मोठी सवलत मिळणार; 'या' बँकेची मोठी घोषणा

बॉलिवूडमध्ये ब्रेकअपची हवा ! 'या' दोन प्रसिद्ध जोड्या झाल्या विभक्त; व्हिडीओ ठरला कारण ?

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत आचारसंहितेच्या काळात १६.१६ लाखांची रोख रक्कम जप्त

SCROLL FOR NEXT